भोपाळ : काँग्रेस नेते कमलनाथ (Congress Leader Kamal Nath) यांनी मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
गोविंद सिंग यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.गोविंद सिंग आता मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदीही असतील.
दरम्यान, 28 एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी कमलनाथ यांना कळवले आहे की, माननीय काँग्रेस अध्यक्षांनी तुमचा मध्य प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. पक्ष तुमच्या योगदानाची मनापासून प्रशंसा करतो.
माननीय काँग्रेस अध्यक्षांनी डॉ. गोविंद सिंग यांना काँग्रेस विधिमंडळ पक्ष, मध्य प्रदेशचे नेते म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला देखील मान्यता दिली आहे; असे त्यांनी शेवटी नमूद केले आहे.