Bihar Crime News : शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह, गावात खळबळ

bihar crime news body unknown girl was found hanging police start investigation

Bihar News : बिहारमधील गया येथे एका मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना कोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोंघा गावातील असून तेथे एका अनोळखी मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.

मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी मगध मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीची हत्या केल्यानंतर तिला झाडाला लटकवण्यात आले.

मात्र हत्येमागचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार रोंघा गावातील काही शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना त्यांना एका अनोळखी मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला.

या संदर्भात कोठी पोलीस ठाण्याचे एसआय चौधरी यांनी सांगितले की, रोंघा गावातील सेलनाहा अहार येथून एका अनोळखी मुलीचा मृतदेह आढळून आला. मृत तरुणीची ओळख अद्याप पटू शकली नाही.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच ही हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.