मोठी बातमी : महाविकास आघाडीतील हालचालींना वेग, राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता : सूत्रांची माहिती

Big News: Movements in Mahavikas Aghadi speed up, possibility of major reshuffle in state cabinet: Sources

मुंबई, 4 एप्रिल : राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या महिन्यात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra cabinet Reshuffle Possible)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गृहखात्याच्या फेरबदलाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

सोबतच काही जणांना बढती देण्यात येणार आहे, तर काही जणांची गच्छती अटळ असल्याचे बोलले जात आहे. या मंत्रिमंडळ बदलात ‘एका’ राज्यमंत्र्याला हमखास बढती मिळणार असल्याची विश्वसनीय वृत्त आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ८ एप्रिल रोजी होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.

विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त असून, त्यासंदर्भातही चर्चा होणार असल्याचे कळते. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त असून हे वृत्त नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने फेटाळून लावले होते.

इतकेच नव्हे तर निधी वाटपात शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर राष्ट्रवादीने कमी निधी दिल्याचा आरोप करण्यात आला.

काँग्रेसचे 25 आमदार नाराज झाल्याचेही वृत्त आहे. या सर्व मुद्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आगामी बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.

दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. विरोधकांनी पूजा चव्हाण यांचा मुद्दा उपस्थित करत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

या प्रकरणाची राज्यभर चर्चा व विरोध होऊ लागल्याने सरकारवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे मुख्यमंत्री राठोड यांनी राजीनामा दिला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुली प्रकरणात टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. देशमुख सध्या कोठडीत आहेत.

गृहखाते आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये बदल?

गृहखात्याच्या कारभारावर शिवसेनेत असंतोष असल्याचे बोलले जात आहे. गृहखाते अधिक सक्षम झाले पाहिजे, असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले होते.

मुख्यमंत्र्यांनी गृहखाते ताब्यात घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष निवडीचा मुद्दा चर्चेत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उत्सुक आहे. मात्र, निवडणूक होत नसल्याने त्यांची नाराजी सातत्याने दिसून येत आहे. या बैठकीत दोन्ही मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यमंत्र्याना बढती?

मंत्रिमंडळ बदलात काही जणांना बढती देण्यात येणार आहे. सोबतच ‘राज्यमंत्री’ म्हणून उत्तम कामगिरी केलेल्या राज्यमंत्र्याला बढती देणार असल्याचे वृत्त आहे.

मागील अडीच वर्षात सर्वात आघाडीवर व चर्चेत असलेले एकमेव राज्यमंत्री संजय बनसोडे असल्याने त्यांच्या नावाचा बढतीच्या यादीत समावेश होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.