उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरात पीएसी बटालियनच्या जवानांवर अज्ञात तरुणाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले.
या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंदिरावरील हल्ल्याची माहिती मिळताच मंदिरात इतरत्र तैनात असलेल्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा इतर सैनिक येत असल्याचे पाहून हल्लेखोराने जोरजोरात अल्लाह-हू-अकबर अशी घोषणाबाजी सुरू केली.
अहमद मुर्तजा असे हल्लेखोराचे नाव आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले. ही बाब लक्षात येताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
गोरखपूरचा रहिवासी असलेला अहमद मुर्तझा हा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आलेले नाही. पीएसी बटालियनचे गोपाल गौर आणि अनिल कुमार पासवान हे गोरखनाथ मंदिराच्या दक्षिण गेटवर ड्युटीवर होते.
IIT Mumbai Chemical Engineer Ahmed Murtaza attacked the security personnel of Gorakhpur Gorakshanath temple @iitbombay
This is the result of continuous targetting of Yogi gvt by liberals & leftists and poisoning minds of youth of this country with so much of hatred & false news. pic.twitter.com/TjWdx0bjyl
— Vishnu Vardhan Reddy (@SVishnuReddy) April 4, 2022
रविवारी संध्याकाळी तो घाईघाईने मंदिराच्या ईशान्य दरवाजातून आत गेला. तो मुख्य गेटवर तैनात कॉन्स्टेबल गोपाल यांच्याजवळ आला आणि त्याने शस्त्र हिसकावून घेण्यास सुरुवात केली.
काही मिनिटांतच हल्लेखोरांनी गोपाल यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. गोपालचा आवाज ऐकून दुसरा हवालदार धावत आला आणि तोही हल्लेखोराने जखमी झाला.
आरोपी हा उच्चशिक्षित असून तो इंजिनीअरिंग शिकला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तजाने आयआयटी मुंबईतून इंजिनिअरिंग केले आहे. त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. त्याला नोकरीही गमवावी लागली आहे. त्यामुळे मानसिक तणावात असल्याचे त्याचे वडील सांगत आहेत.
जेव्हा त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडले तेव्हा तो एकच गोष्ट वारंवार सांगत होता की कोणीतरी त्याच्यावर गोळी मारा. या चकमकीत तोही जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेमागील नेमके सत्य काय आहे? पोलीस तपास करत आहेत. हल्लेखोरांकडून धारदार शस्त्र, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप आणि विमानाचे तिकीट जप्त करण्यात आले.
या हल्ल्यात मूर्तीजाचा साथीदार ही सामील असल्याचा संशय पोलिसांना आहे. यासाठी पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. आरोपीच्या वडिलांचीही चौकशी सुरू आहे.