Bank Holiday : डिसेंबरमध्ये सर्व महत्त्वाचे व्यवहार पूर्ण करा, बँका राहतील 13 दिवस बंद

Bank Holiday in december 2022

Bank Holidays in December 2022 : नोव्हेंबर अखेरीस फक्त एक दिवस उरला आहे. डिसेंबर २०२२ चा शेवटचा महिना आहे. प्रत्येकाला बँकेत काम आहे.

पण पुढच्या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर सर्वप्रथम बँकेचे किती दिवस कामकाज चालेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने डिसेंबरची बँक हॉलिडे लिस्ट जाहीर केली आहे. डिसेंबरमध्ये दुसऱ्या-चौथ्या शनिवार आणि रविवारी बँका बंद असतात आणि काही सणही असतात त्यामुळे बँकांना सुट्ट्या असतात.

डिसेंबरमध्ये 14 दिवस बँका बंद राहतील, परंतु ऑनलाइन आणि नेट बँकिंग सेवा उपलब्ध असतील. डिसेंबरच्या सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच RBI च्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

ही आहे बँक हॉलिडेची संपूर्ण यादी 

  • 3 डिसेंबर – : सेंट फ्रांसिस जेवियर फीस्ट (पणजी)
  • 4 डिसेंबर : रविवार  (सर्व ठिकाणी )
  • 5 डिसेंबर : गुजरात विधानसभा इलेक्शन  (अहमदाबाद)
  • 10 डिसेंबर : दूसरा शनिवार (सार्वजनिक)
  • 11 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)
  • 12 डिसेंबर : Pa-Togan Nengminja Sangma (शिलॉन्ग)
  • 18 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)
  • 19 डिसेंबर : गोवा लिब्रेशन डे (पणजी)
  • 24 डिसेंबर : चौथा शनिवार (सार्वजनिक)
  • 25 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)
  • 26 डिसेंबर : क्रिसमस सेलिब्रेशन/Losoong/Namsoong (आइजवाल, गैंगटोक, शिलॉन्ग)
  • 29 डिसेंबर : गुरू गोविंद सिंह जन्मदिवस (चंडीगढ़)
  • 30 डिसेंबर : U Kiang Nangbah (शिलॉन्ग)
  • 31 डिसेंबर : थर्टी फस्ट (आइजवाल)