Ankita Murder | झारखंडमधील दुमका येथे जिवंत जाळलेल्या अंकिता सिंगचा मृत्यू झाला आहे. पाच दिवस ती जीवनाची लढाई लढत होती. शाहरुख नावाच्या तरुणाने तिला जिवंत जाळल्याचा आरोप आहे.
शाहरुखने अंकितावर फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकला होता. अंकिता प्रतिसाद देत नसल्याने शाहरुखने तिच्या घरात घुसून पेट्रोल ओतून पेटवून दिले.
अंकिताला दवाखान्यात नेण्यात आले पण अखेर ती जीवनाची लढाई हरली. दरम्यान, शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पोलिस कोठडीत हसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना लोकांनी शाहरुखच्या ‘बेशरम हसण्यावर’ प्रश्न केला. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना लोकांनी लिहिले की, ‘शाहरुखच्या निर्लज्ज हसण्यावरून हे स्पष्ट होते की अंकिताला मारल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाही.’ सध्या शाहरुखला पोलिसांनी अटक केली असून या हत्येतील अन्य आरोपींबाबत त्याची चौकशी सुरू आहे.
शाहरुख हाच आहे ज्याच्याशी अंकिताला बोलायचे नव्हते. शाहरुखने अंकिताचा नंबर कुठून तरी घेतला होता. यानंतर तो तिला फोन करून त्रास देत होता.
अंकिताने शाहरुखला अनेक वेळा समजावले की मला फोन करू नको, पण त्याने ऐकले नाही. तो सतत तिला धमकावत होता, जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुला मारून टाकेन, अशी धमकी शाहरुखने द्यायला सुरुवात केली.
See the shameless #Smile of Shahrukh. He has no regrets after burning a Hindu girl to de@th, even after being arrested. #JusticeForAnkita pic.twitter.com/LQ1rJAMOy9
— Akhilesh Kant Jha (@AkhileshKant) August 28, 2022
शाहरुखच्या या कृतीबद्दल अंकिताने घरच्यांना सांगितले. याआधीच घरातील सदस्य काही पाऊल उचलण्याआधीचं ही दुखद घटना घडली.
रांचीमधील RIMS मध्ये उपचारादरम्यान अंकिताने संपूर्ण घटना सांगितली. ही घटना समोर आल्यानंतर दुमकासह संपूर्ण झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्ष (भाजप), बजरंग दल, करणी सेनेसह अनेक संघटना ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत आणि मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.
दरम्यान, रांचीच्या रिम्समध्ये अंकिता जीवनाशी लढा देत होती, ज्यांच्यासाठी संपूर्ण झारखंड प्रार्थना करत आहे. 29 ऑगस्ट 2022. अंकिताच्या कुटुंबासाठी ती काळोखी सकाळ होती, जेव्हा डॉक्टरांनी मला माफ करा असे सांगितले. अंकिता जीवनाची लढाई हरली होती.
ज्या मुलीला ग्रॅज्युएशननंतर आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारायची होती, ती जीवनाची लढाई हरली. केवळ अंकिताच नाही तर तिचे कुटुंबही एक लढाई हरले होते, ती म्हणजे तिच्या मुलीला सुखरूप घरी पोहोचवण्याची. अंकिताचा मृतदेह खांद्यावर घेऊन नातेवाईक दुमका येथे आले.
दुमका येथे अंकिताच्या मृत्यूची बातमी कळताच पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. अंकिताच्या मृत्यूनंतर एक संतापाची लाट उसळली आहे. मृतदेह घरी पोहोचताच हजारो लोक तेथे पोहोचले.
कडेकोट बंदोबस्तात अंत्ययात्रा काढण्यात आली असून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आम्ही हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू आणि आरोपी शाहरुखला फाशी देऊ, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.