मुंबई : राज्यात सध्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे.
काल भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीला शिवसैनिकांनी लक्ष्य केल्यानंतर आज माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. यामध्ये त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे.
किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते.
यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मोठा दगड फेकला.
या हल्यात त्यांच्या गाडीची काच फुटून काचांचे तुकडे त्यांच्या हनुवटीवर लागले. पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांवरती दुसऱ्यांदा हल्ला केला आहे.