Ajab Pyaar Ki Gajab Kahani : प्रेमाचं कायपण, प्रेमासाठी वाट्टेल ते, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं आणि वाचलं असेल. पण काही लोक हे वाक्य खऱ्या अर्थाने जगतात; असं म्हणतात की प्रेमात वय, पैसा आणि स्टेटस महत्त्वाचं नसतं, तर तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्तीच महत्त्वाची असते.
आता लाहोर, पाकिस्तानमध्ये याची पुष्टी झाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका 19 वर्षीय तरुणीची येथील 70 वर्षीय वृद्धाशी नजरानजर झाली.
दोघांमध्ये काही बोलणे झाले, नंतर त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या दोघांची लव्हस्टोरी सध्या व्हायरल होत आहे.
लियाकत आणि शमाइला दोघेही लाहोरमध्ये राहतात. लियाकत अली त्याच्या प्रेमकथेबद्दल खूप मोकळे आहेत. लियाकतने त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले की, ‘एकदा ती (शमाइला) निघून गेली तेव्हा मी मागून एक गाणे गुणगुणायला सुरुवात केली. तिने माझ्याकडे वळून पाहिलं. मग काय, आम्ही प्रेमात पडलो.
याबाबत शमाईलाला विचारले असता, लियाकत तुझ्यापेक्षा वयाने किती मोठा आहे? यावर ती लगेच म्हणाली, ‘हे पहा, प्रेम हे वय बघत नाही, प्रेम फक्त प्रेम पहाते. वय असो, जात असो, काही महत्वाचे नाही.
प्रेमात फक्त प्रेम बघितले जाते. वयातील अंतरामुळे चर्चेत असलेल्या या पाकिस्तानी जोडप्याच्या प्रेमकथेवर सोशल मीडिया यूजर्स भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
त्यानंतर नातेवाईक म्हणाले की, ही तुमची इच्छा असेल तर आम्ही काय करू. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याचे लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. वयात अंतर असलेल्या जोडप्याने लग्न करावे का? याबाबत लियाकत यांना विचारले असता ते म्हणाले की, ते झालेच पाहिजे.
याबाबत बोलताना शमाईला म्हणाली की, प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. लियाकत म्हणाले की, रोमँटिक होण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रत्येक वयाची मजा वेगळी असते.
लियाकत म्हणाले की, त्यांनी आयुष्यभर आनंद लुटला आहे. शमायला म्हणते की, ती लियाकतसोबत खूप खूश आहे. दरम्यान, ही प्रेमकथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुगलवर अनेक नेटिझन्सच्या प्रेमकहाणी वाचल्या जात आहेत.