Agniveer Bharti Yojana : भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेत (Agniveer Bharti) बदल करण्यात आला आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजनेंतर्गत (Agnipath Yojana) अग्निवीर होण्यासाठी आता प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
भरती प्रक्रियेत हा मोठा बदल होणार आहे, त्यासाठी 9 जानेवारीला ग्वाल्हेरमध्ये चाचणीही होणार आहे. सर्व काही नियोजनानुसार झाले तर हा बदल लवकरच लागू केला जाईल.
MOU वर स्वाक्षरी करण्यात आली
भारतीय सैन्यात शिपाई (जनरल ड्युटी), शिपाई (लिपिक) आणि शिपाई (ट्रेड्समन) च्या भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक प्रवीणता चाचणी घेतली जाते. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते.
मागील अनेक वर्षापासून भारतीय सैन्य यामध्ये बदल करण्याच्या तयारीत होते, ज्या अंतर्गत प्रथम सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) म्हणजेच लेखी परीक्षा घेतली जाईल.
त्यानंतर शारीरिक प्रवीणता चाचणी आणि नंतर वैद्यकीय चाचणी, त्यानंतर निवडलेल्यांची उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर केली जाईल.
या बदलाची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. या अंतर्गत भारतीय लष्कर आणि एज्युकेशन कन्सल्टंट इंडिया आरटीआय लिमिटेड (EDC IL) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल
आतापर्यंत लेखी परीक्षा ओएमआर शीटवर घेतली जात होती. ही परीक्षा केवळ लष्कराकडून घेतली जाते, मात्र आता लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
यानंतर, रिक्त पदांच्या 10 ते 15 पट उमेदवारांची गुणवत्ता यादी जारी केली जाईल. शारीरिक प्रवीणता चाचणीसाठी त्यांना प्रवेशपत्र दिले जातील, त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी यात केली जाईल.