शूजमध्ये पाय ठेवताच मुलगा वेदनेने ओरडला, हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला

After putting his feet in shoes boy collapsed, had seven heart attacks and died

ब्राझीलच्या साओ पाउलो शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, शूजमध्ये पाय ठेवताच 7 वर्षांचा मुलगा वेदनेने ओरडू लागला.

त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, पण रुग्णालयात नेल्यावर मुलाला सलग सात हृदयविकाराचे झटके आले.

यानंतर रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाला. शूजमध्ये विषारी विंचू चावल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ब्राझीलच्या साओ पाउलो शहरात ही घटना घडली.

कुटुंबासह बाहेर जात होता 

मृत 7 वर्षीय मुलगा 23 ऑक्टोबर रोजी कुटुंबासह फिरायला गेला होता.त्यासाठी तो तयार होऊन बूट घालण्यासाठी गेला होता. शूजमध्ये पाय ठेवताच तो वेदनेने किंचाळला. त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्या.

मुलाच्या बुटात एक विंचू आढळला

त्याची आई अँजेलिटा मुलाला पाहून खूप घाबरली. तिने मुलाजवळ जाऊन पाहिले असता मुलाचा पाय लाल झाला होता. तिने आजूबाजूला कोणताही प्राणी शोधला पण काहीही दिसले नाही. त्यामुळे तिने बुटांच्या आत पाहिले असता आत एक विषारी विंचू दिसला.

शूजमध्ये ब्राझिलियन पिवळा विंचू होता, जो जगातील सर्वात विषारी विंचूंपैकी एक आहे. या विंचूला टायटस सेरुलेटस (Tityus Serrulatus) असेही म्हणतात. हा सर्वात विषारी विंचू मानला जातो. या विंचू चावल्यानंतर कुणाचाही मृत्यू होऊ शकतो.

उपचारादरम्यान मुलाला सात हृदयविकाराचे झटके  

यानंतर मुलाचे कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने मुलावर उपचार सुरू केले. पण हॉस्पिटलमध्ये मुलाला सात हृदयविकाराचा झटका आला आणि 25 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला.