Roasaheb Danve News : छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे.
रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. रावसाहेब दानवे यांचा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावेळी पोलिस आणि उदयनराजे समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनीही त्यावर टीकास्त्र सोडले.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना ‘भाजप नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा सुरू ठेवली आहे’ अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दानवे यांच्या वक्तव्यामुळे मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा सुरू केली आहे. भाजपच्या या बांडगुळांचा कडेलोट करण्याची वेळ आली आहे, असे विधान आमदार मिटकरी यांनी केले आहे.