दुर्दैवी : कर्जबाजारीपणाला कंटाळून 55 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

Unfortunate: 55-year-old farmer commits suicide due to debt

बीड : राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. बीडमध्ये आज आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

या शेतकऱ्याच्या आत्महत्येने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड जिल्ह्यात एका 55 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही धक्कादायक घटना बीडच्या कळसांबर गावात रात्री 11 वाजता उघडकीस आली आहे. सुग्रीव वाघमारे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गेल्या काही वर्षांपासून नापिकी आणि कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळलेल्या मृत सुग्रीव वाघमारे यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, सुग्रीव वाघमारे यांच्यावर दिड लाखांचे बँकेचे कर्ज आहे. नेकनूर येथील एसबीआय बँकेतून 1,50,000 रु. तसेच इतरही खाजगी व्यवहार असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.