टी. राजा सिंह | वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार कोण आहेत?

T. Raja Singh | Who are the BJP MLAs who made controversial statements?

T. Raja Singh | मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांना भाजपने निलंबित केले आहे. यापूर्वी त्यांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती.

भाजपाने टी. राजा यांना नोटीस ‘तुमचे निलंबन का करू नये’ अशी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. राजा सिंह यांना पक्षाने त्यांना दहा दिवसांची मुदत दिली आहे.

कॉमेडियन मुन्नवर फारुकीचा हैदराबादमध्ये कॉमेडी शो होता. त्याला टी. राजा सिंह यांनी विरोध केला आहे. मुन्नवर फारुकी यांनी हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवली होती, त्यामुळे त्यांच्या शोला परवानगी देऊ नये, असे राजा सिंह म्हणाले होते.

गोशामहल मधील भाजप आमदार राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल काही वक्तव्य केले होते. त्यावरून वाद सुरू झाला आहे. सोमवारी रात्री हैदराबादमधील मुस्लिमांनी राजा सिंह यांच्या अटकेची मागणी केली.

हैदराबाद पोलिसांनी राजा सिंह यांच्याविरोधात चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषा वापरल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अटकेनंतर राजा सिंह यांना बोलाराम पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

या मुद्द्यावर ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “भाजप हे जाणूनबुजून करत आहे. यावरून त्यांचा पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दलचा राग दिसून येतो.”

मुन्नावर फारुकीने ज्याप्रमाणे हिंदू देवतांची खिल्ली उडवली, त्याचप्रमाणे हा देखील एक विनोदी प्रकार असल्याचे टी. राजा सिंह यांनी म्हटले आहे.

टी. राजा सिंह कोण आहेत?

टी.राजा गोशामहल मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते बजरंग दलाचे कार्यकर्ते होते.

2014 च्या निवडणुकीपूर्वी टी. राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी ते तेलगू देसम पक्षात होते. 2009 मध्ये ते तेलुगु देसमच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले.

टी.राजा हैदराबाद आणि आसपासच्या गोरक्षण मोहिमांसाठी ओळखले जातात. तेलंगणातील 2018 च्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा तेलंगणा राष्ट्र समितीची वाताहात झाली होती.

त्यातही तेलंगणात भाजपचे 5 आमदार निवडून आले, त्यातील एक टी.राजा आहेत. राजा यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी 75 हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

अयोध्येत राम मंदिर उभारणीला विरोध करणाऱ्यांविरोधात त्यांनी सोशल मीडियावर अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.