मुंबई : आमदारांसोबतच आता शिवसेनेचे खासदारही बंड करण्याच्या तयारीत असून 11 खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली त्याच दिवशी या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचे आता समोर येत आहे.
त्यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते.
त्याच दिवशी शिवसेनेच्या 11 खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचे कळते. अमित शहा आणि या 11 खासदारांमध्ये साडेपाच तास चर्चा झाल्याचे कळते.
शिवसेनेच्या एका खासदाराने याबाबत माहिती दिली. ही बैठक अमित शहा यांच्या निवासस्थानी झाली असून त्यांनी पुढे काय करायचे आणि काय भूमिका घ्यायची यावर चर्चा केल्याचे कळते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणनीती काय असावी किंवा द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी लोकसभेत वेगळा गट तयार करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तशी मागणी करावी, यावर चर्चा झाल्याचे कळते.
द हिंदूने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले असून 14 तारखेला शिवसेनेचे खासदार बंड करून लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याची तयारी करतील, असे सांगण्यात आले आहे.
शिवसेना खासदारांनी भाजप आणि शिंदे गटाशी युती करण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणल्याचे चित्र आहे. यातील अनेक खासदार मोदींच्या करिष्म्यावर निवडून आलेले आहेत.
त्यामुळे 2024 मध्ये लोकसभेत निवडून यायचे असेल तर भाजपच्या पाठिंब्याची गरज असल्याचे या खासदारांचे मत असल्याची माहिती आहे.