श्रीरंगपटना, कर्नाटक : मुलींच्या एका गटाने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिडीया रिपोर्ट नुसार हे प्रकरण कर्नाटकातील आहे. जिथे एका कथितरित्या शाळेच्या मुख्याध्यापकाला काही विद्यार्थ्यांनीनी बेदम मारहाण केली होती.
पालक आणि विद्यार्थ्यांनी असा दावा केला होता की, मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, त्यानंतर पीडितेने व इतर विद्यार्थिनींसह त्या मुख्याध्यापकाला मारहाण केली.
एका विध्यार्थिनीने तिला अश्लील व्हिडीओ दाखवून अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ 15 डिसेंबर रोजी @HateDetectors ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. “कर्नाटकातील मंड्या येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मारहाण केली आणि एकीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना श्रीरंगपट्टणातील काटेरी गावात घडली. मुख्याध्यापकाचे नाव चिन्मयानंदमूर्ती आहे.”
The headmaster of a school in #Karnataka’s #Mandya was thrashed by students in the hostel & handed over to the police for allegedly misbehaving with one of them. The incident took place in #Srirangapatna's #Katteri village.
The headmaster, identified as #ChinmayaAnandaMurthy. pic.twitter.com/ocssFLongl
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 15, 2022
क्लिपला 2500 हून अधिक व्ह्यूज आणि 54 लाईक्स मिळाले आहेत. या ट्विट थ्रेडवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. काही वापरकर्त्यांनी मुलींच्या शौर्याचे कौतुक केले, तर काहींनी असे मुख्याध्यापक शाळेची बदनामी करत असल्याचे लिहिले.
व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थी त्या मुख्याध्यापकाला जमिनीवर लोळवून लाथा बुक्या घालताना दिसत आहेत. दरम्यान, एक विद्यार्थिनी त्यांना म्हणते, सर तुम्ही तिला का हात लावला? तुम्ही प्राचार्य आहात ना?
हे प्रकरण मंड्या जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील आहे. शाळेच्या परिसरात 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे.
या प्रकरणातील आरोपीवर आयपीसी कलम 354 ए (लैंगिक छळ), 354 डी (पीछा मारणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, शाळेतील एका विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, बुधवारी, 14 डिसेंबरच्या रात्री मुख्याध्यापक (चिन्मयानंद) यांनी तिला आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थी वसतिगृहाच्या दिशेने धावला आणि काही वेळाने सहकारी विद्यार्थ्यांसह परत आला आणि त्यांनी मिळून त्या व्यक्तीला काठीने मारहाण केली.
गेल्या 6 वर्षांपासून हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या चिन्मयानंदला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना निलंबित करण्याचीही मागणी केली जात आहे.