SBI Clerk Recruitment 2022 : SBI लिपिक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे चांगली बातमी आहे. SBI दरवर्षी लिपिकांच्या पदांसाठी रिक्त जागा भरते.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने लिपिक भरती 2022 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याद्वारे, SBI मध्ये लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएटच्या पदांवर 5000 हून अधिक जागा रिक्त आहेत.
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 7 सप्टेंबरपासून करता येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.
SBI Clerk Recruitment 2022 : महत्वाची तारीख
SBI लिपिक भरती 2022 अधिसूचना – 6 सप्टेंबर 2022
SBI लिपिक भरती 2022 अर्ज सुरू – 7 सप्टेंबर 2022
SBI लिपिक भरती 2022 अर्जाची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022
SBI लिपिक भरती परीक्षा 2022- नोव्हेंबर 2022
SBI लिपिक भरती परीक्षा प्रवेशपत्र – 29 ऑक्टोबर 2022
एसबीआय लिपिक भरती मुख्य परीक्षा – डिसेंबर 2022/जानेवारी 2022
SC | ST | OBC | EWS | GEN | Total |
743 | 467 | 1165 | 490 | 2143 | Current 5008 |
12 | 185 | 07 | 00 | 00 | Backlog 204 |
755 | 652 | 1172 | 490 | 2143 | 5212 |
SBI Clerk Recruitment 2022 : रिक्त पदांचे तपशील जाणून घ्या
SBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक पदासाठी एकूण 5008 रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ, दिल्ली, महाराष्ट्र, मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि उत्तर पूर्व येथे लिपिक पदासाठी भरती केली जाईल. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. यानंतर लखनऊ आणि भोपाळमध्ये भरती केली जाईल.
SBI Clerk Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी
- वयाची आवश्यकता: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- शुल्क: सामान्य/OBC/EWS: ₹750/- (SC/ST/PWD/ExSM: शुल्क नाही)
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2022
परीक्षा कधी होणार हे जाणून घ्या
SBI लिपिक भरती परीक्षा 2022 नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
परीक्षा
- पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2022
- मुख्य परीक्षा: डिसेंबर 2022 / जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट : पाहा
- जाहिरात Notification : पाहा
- Online अर्ज : Apply Online
SBI लिपिक परीक्षेचा नमुना
ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. सर्वप्रथम सर्व उमेदवारांना प्रिलिम्स परीक्षेला बसावे लागेल (SBI प्रिलिम्स परीक्षा 2022). प्रिलिममध्ये निवडलेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील. लक्षात ठेवा की SBI लिपिक परीक्षेत मुलाखतीची फेरी नसते.