Rishabh Pant Accident: क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी रुरकीच्या नरसनमध्ये भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी कारचा चक्काचूर झाला होता.
ऋषभ कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला खूप मार लागण्याने तो कार मधून बाहेर निघू शकला नाही, मग तो कसेतरी स्वतःहून तिथून बाहेर पडला.
ऋषभच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर सर्व रक्कम रस्त्यावर विखुरली होती.
जेव्हा ऋषभ जखमी अवस्थेत तडफडत होता, त्यावेळी काही लोक ऋषभला मदत करण्याऐवजी रस्त्यावर विखुरलेल्या नोटा खिशात कोंबण्यात आणि व्हिडिओ बनवण्यात मग्न झाले होते.
त्याचवेळी दोन तरुण अगदी देवदूत बनून पुढे आले. त्यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करून ऋषभ पंतला रुरकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी दोन तरुणही तेथे होते.
#WATCH | Uttarakhand: Cricketer Rishabh Pant shifted to Max Hospital Dehradun after giving primary treatment at Roorkee Civil Hospital. His car met with an accident near Roorkee pic.twitter.com/YTvArj8qxc
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 30, 2022
यातील एक तरुण पुरकाजीजवळील शकरपूर गावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या लिबरहेरी येथील उत्तम साखर कारखान्यात काम करतो.
Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway near Roorkee border, car catches fire. Further details awaited. pic.twitter.com/qXWg2zK5oC
— ANI (@ANI) December 30, 2022
तो सकाळी आपल्या ड्युटीवर जात होता. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतला त्याने ओळखले. तातडीने त्याने मदत केली आणि ऋषभ पंतला रुग्णालयात दाखल केले.
डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, ऋषभला रुग्णालयात आणले असता दोन तरुणही तिथे होते. त्यांनी ऋषभला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केले.
डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, भरतीदरम्यान ऋषभ पंतची प्रकृती थोडी गंभीर होती, पण जसजसा वेळ निघून गेला तसतशी प्रकृती सुधारू लागली आहे. आता प्रकृती स्थिर आहे.
यानंतर ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ पंतची प्लॅस्टिक सर्जरीही येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.