Bollywood News : ती आली, तिने पाहिलं आणि ती जिंकली. रसिक प्रेक्षक तिला कधीच विसरू शकत नाहीत. सैराट मधील आर्ची रसिकांच्या मनावर अजून गारुड घालत आहे. तिचं नाव आणि स्टाईल दर्शक विसरले नाहीत.
हो, आपण आर्चीबद्दल बोलत आहोत. ते रिंकू राजगुरूबद्दल. सैराट सिनेमाची जादू अजूनही कायम आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) कोणता नवा चित्रपट घेऊन येत आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
रिंकूने आपल्या सोशल मीडियावर याबद्दल शेअर केले आहे. रिंकूचा नवीन सिनेमा म्हणजे ‘प्रेमाचा आठवा रंग’. त्यात ती कृतिकाच्या भूमिकेत आहे. खुशबू सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा 17 जूनला रिलीज होणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटात रिंकू राजगुरूची छोटीशी भूमिका होती. तिने छोट्या भूमिकेत आपली छाप सोडली.
सैराटनंतर तिने मराठी चित्रपटांमध्ये मेकअप, कागर केला होता. तर २०० हल्ला हो, अनपाॅज्ड, १०० या वेब सीरिजना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
रिंकू (Rinku Rajguru) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. रिंकू नेहमीच तिचा नवा फोटो, व्हिडिओ शेअर करीत असते. सोशल मिडीयावर तिचे फॅन फॉलोअर्सही खूप आहेत.
रिंकूने (Rinku Rajguru) एका मुलाखतीत सांगितले होते, ‘मी कधीही कोणतीही प्रतिमा बदलणार नाही. माझी प्रत्येक भूमिका उत्कंठावर्धक आणि वेगळी असावी, मला वाटतं की प्रेक्षकांनी मला नवीन भूमिकांमध्ये पाहावं, त्या भूमिका आवडल्या पाहिजेत. ‘
Rinku Rajguru हेही म्हणाली, ‘त्यासाठी मी साकारलेल्या जुन्या भूमिका विसरून जाव्यात, असं मात्र वाटत नाही आणि ते पटतही नाही. मला अजूनही माझ्या जुन्या भूमिकेमुळे ओळखलं जातं, हे नेहमीच छान वाटतं.
आपल्या जुन्या कामातूनच आपल्याला नवं काम मिळतं, मग ते विसरून कसं चालेल? माझ्या प्रत्येक कामातून मी स्वतःला आणि प्रेक्षकांना काही तरी नवं देण्याचा विचार करत असते.’ आता तिच्या नव्या सिनेमाची उत्सुकता आहेत. सोमवारी टीझर येणार आहे. #Rinku Rajguru