Rakhi Sawant & Adil Durrani Breakup: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आणि बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. हे दोघे सतत एकत्र दिसतात.
काही दिवसांपूर्वी अशीही चर्चा होती की, राखी आणि आदिल लवकरच लग्न करणार आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्नाच्या बातम्यांचे स्पष्टपणे खंडन केले आणि राखीला यामागचे कारण सांगितले. आदिलच्या म्हणण्यानुसार, राखीचा त्याच्यावर 100 टक्के विश्वास नसेल तर तो तिच्याशी लग्न कसा करेल.
राखीमुळे सतत चर्चेत राहणारा आदिलही आज लोकप्रिय झाला आहे. दोघे नुकतेच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसले. एका मुलाखतीदरम्यान आदिलला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले.
यावेळी आदिलने धक्कादायक खुलासा केला आहे. राखी त्याच्याबद्दल असुरक्षित आहे, ती केवळ त्याच्यावर संशय घेत नाही तर तो आपल्या गावी गेल्यावर काय करतो हे शोधण्यासाठी एका माणसाला पाठवते.
राखीला शंका आहे की, आदिलचे त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध आहेत. याच कारणामुळे आदिलने राखीच्या लग्नाचे नियोजन तूर्तास पुढे ढकलले आहे. राखीला संशय येणे थांबले तरच तो लग्न करेल.
दरम्यान, आदिलने लग्नाला नकार दिला असला तरी नुकतीच राखीने ‘बिग बॉस’च्या घरात आदिलसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
तिने सांगितले की, तिला बिग बॉसचा भाग व्हायचे आहे आणि तिथे आदिलशी लग्न देखील करायचे आहे. सलमान खानने आपली मुलगी दान करावी अशी तिची इच्छा आहे.