Crime News : अल्पवयीन मुलीवर 8 जणांचा दोनदा बलात्कार आणि ब्लॅकमेल, अडीच लाख दिले नाहीत व्हिडिओ व्हायरल

Rape

Crime News : राजस्थानमधील भिवडी येथील एका धक्कादायक घटनेत आठ नराधमांनी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर दोनदा बलात्कार करून तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले.

या व्हिडिओच्या जोरावर आरोपींनी 50 हजार रुपयेही घेतले. पण हद्द तेव्हा पोहोचली जेव्हा आरोपीने पीडितेकडे अडीच लाखांची मागणी केली आणि पैसे न दिल्याने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

भिवडीतील हे प्रकरण बुधवारी उघडकीस आले जेव्हा अल्पवयीन मुलीचे नातेवाईक पोलिसात पोहोचले. कुटुंबीयांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपीने तिच्यावर दोनदा बलात्कार केला.

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 डी (Gang Rape) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, डिसेंबर 2021 मध्ये मुलीवर आठ जणांनी पहिल्यांदा सामूहिक बलात्कार केला होता.

मीडिया रिपोर्ट्स मध्ये किशनगढ बास सर्कलचे पोलिस उप अधीक्षक (डीएसपी) अतुल आग्रा यांनी सांगितले की, तक्रारीनुसार एका आरोपीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल्पवयीन मुलीला फोन केला आणि त्याला सांगितले की, त्याच्याकडे तिचे काही फोटो आहेत आणि जर तिने पैसे दिले नाहीत तर व्हायरल करेल.

डीएसपी म्हणाले की, जेव्हा अल्पवयीन मुलगी घटनास्थळी पोहोचली तेव्हा आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि या क्रूरतेचा व्हिडिओ बनवला.

अनेक महिन्यांपासून आरोपीने व्हिडिओ आणि छायाचित्रे वापरून मुलीला ब्लॅकमेल केले आणि सुमारे 50,000 रुपये उकळले.

याप्रकरणी डीएसपी पुढे म्हणाले की, 50 हजार घेतल्यानंतर आरोपींनी तिला आणखी पैसे देण्यासाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि मुलीकडून एकूण अडीच लाख रुपयांची मागणी केली.

अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा मुलगी इतके पैसे देऊ शकत नव्हती तेव्हा आरोपीने तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्सअपवर कुणाला तरी पाठवला.

डीएसपीच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरपासून मुलीवर दोनदा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. हा गुन्हा गावातच झाला असून, तरुणी या दोन आरोपींना चांगलीच ओळखत होती.

व्हिडीओ व्हायरल होईपर्यंत मुलीने तिच्या घरच्यांना लैंगिक छळ आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती दिली नव्हती.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती कुटुंबातील इतर कोणाला कळल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.