Raj Thackeray Grandson । राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, हे आहे बाळाचे नाव

Raj Thackeray Grandson. Naming of Raj Thackeray's grandson, this is the baby's name

Kian Amit Thackeray । आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपूर्वी आजोबा झाले. 5 एप्रिल 2022 रोजी राज यांचा मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्न मिळाले.

शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आज (शुक्रवार) पार पडलेल्या नामकरण सोहळ्यात राज यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आले.

राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असेल यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावरही यावरून बरेच पोस्ट व्हायरल झाले होते.

या सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ फुलांनी सजवण्यात आला. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते. काही दिवसांपूर्वीच अमित यांनी बाळाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

Raj Thackeray: कुर्रर्रर्र...राज ठाकरेंच्या नातवाचं बारसं; जाणून घ्या नाव अन् त्यामागील अर्थ

मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर माहिती दिली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या नातवाचे नाव काय? तसेच राज ठाकरे यांच्या नातवाचे नाव काय असेल, असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते.

Kiaan Name Meaning in Marathi । कियान नावाचा अर्थ, इतिहास आणि अंकशास्त्र

आता सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून राज ठाकरेंच्या नातवाचे नाव सांगितले आहे. सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या नातवाचे नाव ‘कियान अमित ठाकरे’ आहे.

नामकरण सोहळ्यात राज यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.

यापूर्वी त्यांनी फेसबुकवर ‘आमचे गुरु आजोबा झाले’ अशी पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘युवराजचे आगमन’ असे लिहून राज ठाकरे यांना नातू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सचिनने अमित ठाकरे यांचे अभिनंदनही केले होते.

अमित आणि मिताली 27 जानेवारी 2019 रोजी विवाहबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच अमित यांनी बाळाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 2019 मध्ये लग्न झाले. त्यांच्या भव्य लग्नाला प्रख्यात नेते, ज्येष्ठ राजकारणी आणि बॉलीवूड आणि मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर अमित ठाकरे यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.