अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या कामावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज? लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रालाही संधी

Prime Minister Narendra Modi angry with the work of many Union Ministers? Maharashtra too will soon get an opportunity to expand the cabinet

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा (कॅबिनेट मंत्री) विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमधील सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.

ज्या मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक खराब असेल त्यांना काढून टाकले जाणार असल्याची माहिती आहे. पक्ष नेतृत्व (पीएम मोदी) अनेक मंत्र्यांच्या कामावर असमाधानी असल्याचे वृत्त आहे.

मंत्रालयाने केंद्र सरकारचे काम जमिनीवर, शेवटच्या घटकापर्यंत कितपत नेले आहे, हे तपासले जाईल. महाराष्ट्रातील सत्ता हस्तांतरणानंतर एकनाथ शिंदे गटातील दोन खासदारांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारमध्ये डझनभर किंवा 12 मंत्र्यांचे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांचे मंत्रिपदही बदलले जाणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून शिंदे गटाचे दोन मंत्री

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात भाजपसोबत एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार-खासदारांची गटही फोडला आहे.

राज्यात मुख्यमंत्रिपद दिल्यानंतर केंद्रातही या गटाला दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधव या दोन खासदारांच्या नावांची सध्या चर्चा आहे.

गेल्या वर्षी मंत्रिमंडळ विस्तार झाला

गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. 2019 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होता. यामध्ये 43 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल यांच्यासह 36 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित सात मंत्री मागील मंत्रिमंडळातील होते.

ज्योतिरादित्य शिंदे यांना हवाई वाहतूक आणि मनसुख मांडवीय यांना आरोग्य मंत्रालय देण्यात आले आहे. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आणि डॉ.हर्षवर्धन यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले.

नुकतेच दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले

राज्यसभेतील खासदारपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे दोन मंत्र्यांनी नुकतेच आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यात मुख्तार अब्बास नक्वी आणि जेडीयूचे आरसीपी सिंह यांचा समावेश आहे.

या दोघांच्या मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार स्मृती इराणी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.