PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत या पदांसाठी भरती, जाणून घ्या पूर्ण माहिती

PNB Recruitment 2022: Recruitment for these posts in Punjab National Bank, know full details

PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती आली आहे. यासाठी बँकेने अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मे आहे. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अधिसूचनेनुसार, विशेष संवर्ग अधिकारी पदासाठी एकूण 145 भरती या भरतीद्वारे करायच्या आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in/pnboapr2 ला भेट द्यावी लागेल.

PNB Recruitment 2022 तपशील
एकूण पदे- 145
रिस्क मैनेजर – 40 पदे
क्रेडिट मॅनेजर – 100 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक – 5 पदे

PNB Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
क्रेडिट मॅनेजर- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार CA/CWA/CFA किंवा कोणत्याही शाखेतील किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असावेत. त्याचबरोबर फायनान्समध्ये पूर्णवेळ एमबीए किंवा फायनान्समध्ये पीजीडीएम केले पाहिजे.

रिस्क मैनेजर : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा किंवा 60% गुणांसह CA/CWA/CFA असावा. तसेच पूर्णवेळ एमबीए पदवी असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ व्यवस्थापक : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे CA/CWA/CFA किंवा कोणत्याही शाखेतील 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. फायनान्समध्ये पूर्णवेळ एमबीए असणे आवश्यक आहे.