PM Modi in Kargil : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. कारगिलमध्ये सैनिकांमध्ये पोहोचलेल्या मोदींनी सैनिकांची भेट घेतली आणि नंतर त्यांना संबोधित केले.
आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले, ‘तुम्ही सर्वजण अनेक वर्षांपासून माझे कुटुंब आहात. माझ्या दिवाळीचा गोडवा आणि चैतन्य तुमच्यामध्ये आहे.
मी पुन्हा पुन्हा धाडसी सैनिक मुला-मुलीकडे ओढला जातो. माझे कुटुंब तुम्ही सर्व आहात. दिवाळीचा प्रकाश तुमच्यात आहे. पाकिस्तानशी असे एकही युद्ध झाले नाही, जिथे माझ्या जवानांनी विजयाचा झेंडा फडकवला नसेल. मला माझ्या पराक्रमी सैनिकांचा अभिमान आहे.
पीएम मोदी म्हणाले, जेव्हा भारताची ताकद वाढते, तेव्हा जागतिक शांतता आणि समृद्धीची शक्यता वाढते. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी ‘आत्मनिर्भर भारत’ अत्यंत आवश्यक आहे; परकीय शस्त्रे आणि यंत्रणांवरील आपले अवलंबित्व कमीत कमी असावे.
सशस्त्र दलात अनेक दशकांपासून सुधारणा आवश्यक होत्या, ज्या आता लागू केल्या जात आहेत. सशस्त्र दलात महिलांचा समावेश केल्यास आपली ताकद वाढेल.
भारताने नेहमीच युद्ध हा शेवटचा पर्याय मानला
Prime Minister Shri @narendramodi has landed in Kargil, where he will celebrate Diwali with our brave soldiers. pic.twitter.com/RQxanDEgDK
— PMO India (@PMOIndia) October 24, 2022
पंतप्रधान म्हणाले, प्रकाशाचा हा सण जगासाठी शांतीचा मार्ग मोकळा करील अशी भारताची इच्छा आहे. जेव्हा सीमा सुरक्षित असतात, अर्थव्यवस्था मजबूत असते आणि समाज आत्मविश्वासाने भरलेला असतो तेव्हा राष्ट्र सुरक्षित असते.
आम्ही युद्धाला पहिला पण शेवटचा पर्याय मानत नाही; आमचा शांततेवर विश्वास आहे, पण शक्तीशिवाय शांतता शक्य नाही. आम्ही नेहमीच युद्ध हाच शेवटचा पर्याय मानला आहे, जर कुणी नजर टाकली तर लष्कर त्याच भाषेत प्रत्युत्तर देईल.
पंतप्रधान म्हणाले, माझ्या सोबत वीर जांबाज नौजवान असताना यापेक्षा चांगली दिवाळी कुठे असू शकते. तुमचे फटाके वेगळे आहेत आणि तुमचे धमाकेही वेगळी आहेत.
Wishing everyone a Happy Diwali. Diwali is associated with brightness and radiance. May this auspicious festival further the spirit of joy and well-being in our lives. I hope you have a wonderful Diwali with family and friends.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022
शौर्याची गाथा लिहित भारत आपले सण प्रेमाने साजरे करतो. संपूर्ण जगाला सामील करून साजरे करतो. कारगिलच्या विजय भूमीकडून तमाम देशवासीयांना आणि संपूर्ण विश्वाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
कारगिलमध्ये लष्कराने दहशताचा फणा ठेचून काढला आणि देशात अशी दिवाळी साजरी केली की आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
कारगिल युद्धाचा उल्लेख केला
कारगिल युद्धाचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले, जेव्हा आमचे जवान कारगिल युद्धात शत्रूला चोख प्रत्युत्तर देत होते, तेव्हा मला त्यांच्याशी भेटण्याचा योग आला.
माझे कर्तुव्य मार्गाने मला रणभूमीत आणले. आम्ही फक्त पुण्य कमवत होतो, देव भक्ती करतो पण तो क्षण देशभक्तीचा होता. तुमची पूजा करायची होती. चारही दिशांना विजयाचे स्तोत्र सुरु होते.
प्रत्येक हृदयात तुमच्याबद्दल आहे. तन मन धन समर्पित करून तुम्ही उभे आहात, तुमच्या मागे पुरा देश उभा आहे. भारत म्हटल्यावर शौर्याचा वारसा आपल्यासमोर उभा राहतो.
पूर्वी अनंत संकटे होती, पण भारताच्या अस्तित्वाचा हा सांस्कृतिक पैलू आजही अखंड आहे. द्रास बटालिक टायगर हिल म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे शत्रूही परास्त झाले याचा साक्षीदार आहे.