Petrol Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले. चांगली बातमी म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. आज इंधनाचे दर स्थिर आहेत.
गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. इंधनाच्या दरात शेवटची वाढ 6 एप्रिल रोजी झाली होती.
राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 99.83 रुपये आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 110.85 रुपये आणि 100.94 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील किमती
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार राजधानी मुंबईत आज पेट्रोलचा दर 120.51 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 99.83 रुपये प्रति लिटर इतका आहे.
औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 121.76 रुपये तर डिझेलचा दर 104.40 रुपये प्रतिलिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.11 रुपये तर डिझेलचा दर 102.82 रुपये आहे.
राज्याची राजधानी नागपुरात पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 120.15 रुपये आणि 102.89 रुपये प्रतिलिटर आहेत. पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.30 रुपये तर डिझेलचा दर 100.20 रुपये प्रतिलिटर आहे.
22 मार्चनंतर इंधनाच्या दरात कमालीची वाढ
केंद्राने इंधन कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 4 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेल 10 रुपयांनी कमी करण्यात आले.
पुढील चार महिने इंधनाचे दर स्थिर राहिले. मात्र, 22 मार्च 2022 नंतर इंधनाचे दर वाढू लागले. गेल्या काही दिवसांत इंधनाच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
मात्र त्यानंतर पुन्हा एकदा इंधनाच्या दरात झालेली वाढ सहा दिवसांपासून ठप्प झाली आहे.