नवी दिल्ली : ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘गाना ॲप’विरोधात (Gaana app) नेटिझन्सचा रोष (Netizens) पाहायला मिळत आहे. सोमवारी (ता. ११) मायक्रो ब्लॉगिंग सोशल साइटवर ‘#Boycott_GaanaApp’ ट्रेंड सुरू झाला.
गाना ॲपवर द्वेष पसरवणाऱ्या गाण्यांचा प्रसार होत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे विवादित गाणे हटवण्यापासून ॲप डिलिट करण्याची मागणी नेटिझन्स करीत आहे.
‘गुस्ताख-ए-नबी की एक ही साजा’ व ‘सर तन से जुदा’ या घोषवाक्यांसह गाना ॲपवर धार्मिक कट्टरवाद्यांकडून शिरच्छेदाचा गौरव करणारी गाणी प्रसारित केली जात असल्याचा आरोप आहे.
यामुळे अनेक नेटिझन्सने (Netizens) गाना ॲपवरून (Gaana app) हे गाणे काढून टाकण्याची मागणी केली आहे. मात्र, गाना ॲपकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
हे गाणे केवळ गाना ॲपच्या (Gaana app) प्लॅटफॉर्मवर नाही तर इतर प्लॅटफॉर्मवरही आहे. हे वादग्रस्त गाणे या सर्व मंचावरून हटवण्याची मागणी नेटिझन्सनी केली आहे.
राजस्थानच्या उदयपूरमधील कन्हैयालाल याची हत्या करणाऱ्या गौस मोहम्मद आणि रियाझ अख्तारी यांनी हत्येनंतर या घोषणा दिल्या होत्या.
गाना ॲपवर ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही साजा’, ‘सर तन से जुदा’ या घोषवाक्यांसह धार्मिक कट्टरवाद्यांकडून शिरच्छेद करणारी गाणी प्रसारित केली जात असल्याचा आरोप आहे.
हिंदूंना अप्रत्यक्ष धमक्या
‘सर तन से जुदा’च्या घोषणेमुळे अनेक हत्या झाल्या. आता हे फक्त रस्त्यावरच मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी आता संगीत प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला आहे.
हिंदूंना अप्रत्यक्ष धमक्या देण्यासाठी ते लहान व्हिडिओंमध्ये डाउनलोड केले जात आहे, असे एका ट्विटर वापरकर्ता लिहिले.
राष्ट्राच्या अखंडतेला गंभीर धोका
हिंदूंविरुद्ध हिंसाचार भडकावणाऱ्या या सोशल प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई व्हायला हवी. हे व्यासपीठ हिंदूविरोधी आणि भारतविरोधी आहे.
हे व्यासपीठ राष्ट्राच्या अखंडतेला गंभीर धोका निर्माण करीत आहे, असे आणखी एका युजरने लिहिले आहे.
ॲपविरोधात स्वाक्षरी मोहीम
ट्विटर या साइटवर ‘#Boycott_GaanaApp’ ट्रेंड चालवला जात आहे. हे गाणे वादग्रस्त आहेत. जे द्वेषाला प्रोत्साहन देते. या गाण्याविरोधात जोरदार ट्रेंड सुरू आहे.
अनेक वापरकर्ते गाना ॲपविरोधातील याचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी मोहीम सोशल मीडियाावर (Social media) चालवत आहेत, असे सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे.
ॲप डिलिट करण्यासाठी मोहीम
सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडवर नेटिझन्स सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. ॲपवरील गाणे द्वेष पसरवणारी आहेत.
ही गाणी ॲपने त्वरित हटवली पाहिजेत असे नेटिझन्स म्हणत आहेत. अशी गाणी समाजात हिंसाचाराला प्रोत्साहन देतात. यामुळे सोशल मीडियावर (Social Media) हे ॲप डिलिट करण्याची मोहीम नेटिझन्स राबवत आहेत.