Mukhya Mantri Kisan Yojana | महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ (CM Kisan Yojana) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मुख्यमंत्री किसान योजने’अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना (Agriculture) वार्षिक 6,000 रुपयांचे अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे.
तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे वृत्त आहे. त्यासाठी येत्या आर्थिक (Financial) वर्षाच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री किसान योजना
मुख्यमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
सध्या देशभरात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार वर्षभर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीप्रमाणेच पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6 हजार रुपये मिळत असल्याची बातमी आहे.
अद्याप तरतूद नाही
या योजनेसाठी बजेटमध्ये किती निधीची तरतूद करण्यात येणार आहे, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
मात्र, शिंदे सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर जाहीर करू शकते. राज्यातील कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील याचीही सध्या माहिती नाही. मात्र नुकत्याच झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.
पीएम-किसान सन्मान निधी योजना काय आहे?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्याच्या खात्यात वर्षातून तीनदा 2000 रुपये जमा केले जातात. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात.
म्हणजेच वर्षातून तीनदा या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते.