MHT CET Admit Card 2022 : एमएचटी सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, येथे डाउनलोड करा

MHT CET Exam Admit Card Released, Here's How to Download

MHT CET Admit Card 2022 : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने आज महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2022 च्या पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे.

प्रवेशपत्र (MHT CET Admit Card 2022) अधिकृत वेबसाइट mahacet.org वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार केवळ या वेबसाइटला भेट देऊन Admit Card डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांच्या मदतीने लॉग इन करणे आवश्यक आहे.

या थेट लिंकवरून MHT CET प्रवेशपत्र डाउनलोड करा

उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून त्यांचे Admit Card डाउनलोड करू शकतात.

या स्टेपसह MHT CET प्रवेशपत्र तपासा

स्टेप 1: उमेदवार अधिकृत वेबसाइट mahacet.org ला भेट द्या.
स्टेप 2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या डमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉग इन करा.
स्टेप 4: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: आता ते तपासा आणि डाउनलोड करा.

ही परीक्षा 27 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. MAH LLB-5 वर्षे, B.Ed- M.Ed, B.Ed., M.Ed, 3 वर्षांचा LLB कोर्स B.A.,B.Sc., B.Ed, B. Planning आणि MCA साठी पुनर्परीक्षा घेतली जाईल.

ज्या उमेदवारांनी पुनर्परीक्षेसाठी अर्ज केला आहे परंतु त्यांना पुनर्परीक्षेला उपस्थित राहण्याची इच्छा नाही, त्यांचा पूर्वीचा प्रयत्न CET स्कोअरसाठी विचारात घेतला जाईल आणि त्यांना CET पुनर्परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.

ज्या उमेदवारांना सर्व्हर बिघाड यासारख्या तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले आणि त्यांची परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही अशा उमेदवारांसाठी ही फेरपरीक्षा घेतली जात आहे.