अमरावती: उदयपूर येथे टेलर कन्हैया लाल याच्या हत्येनंतर महाराष्ट्रात देखील केमिस्ट उमेश कोल्हे यांची अमरावती हत्या करण्यात आल्यानंतर खळबळ माजली होती.
दरम्यान या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या गुन्हेगाराचे नाव इरफान खान असे असून तो एक एनजीओ चालवतो. या प्रकरणी पोलिसांनी याधी सहा जणांना अटक केली आहे.
अमरावती हत्याकांडातील प्रमुख आरोपी इरफान (३५) याला पोलिसांनी शनिवारी अटक केली. अमरावती पोलिसांनी सांगितले की, त्याने संपूर्ण योजना बनवली होती आणि कट रचला होता आणि तोच खून प्रकरणाचा मास्टरमाईंड होता.
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये एका ५४ वर्षीय केमीस्टची हत्या करण्यात आली होती, या प्रकरणी शेख रहीम शेख इरफान याला अमरावती पोलिसांनी नागपूर येथून अटक केली.
Police have arrested the seventh accused and the mastermind Shaikh Irfan Shaikh Rahim in connection to Umesh Kolhe murder case: Nilima Araj, Police Inspector, City Kotwali PS, Amravati
— ANI (@ANI) July 2, 2022
केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची अमरावतीमध्ये 21 जून रोजी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती, त्याच्या एक आठवडा आधी राजस्थानमधील उदयपूर येथील टेलर कन्हैया लालची दोन जणांनी वार करून हत्या केली होती.
उमेश कोल्हे यांच्या हत्येबद्दल स्थानिक भाजप नेत्यांनी पोलिसांना पत्र सादर केले आणि बदला घेण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला.
दरम्यान गृह मंत्रालयाने (MHA) या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवला आहे. गृहमंत्रालयाने अमरावतीमधील उमेश कोल्हे यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.
हत्येमागील कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल, असे गृह मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.