Maharashtra SSC Result 2022 Declared: दहावीचा निकाल जाहीर; ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

144
SSC Result 2022: Date of 10th result fixed, 10th result will be announced tomorrow!

SSC Result 2022 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result 2022) जाहीर झाला आहे.

एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे.

यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती.

दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

राज्यातील १२,१२० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातील २९ शाळांमध्ये शून्य टक्के निकाल लागला आहे.

दृष्टिक्षेपात निकाल (Overall 10th Result)-

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी (नियमित)- १५ लाख ८४ हजार ७९०

परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – १५ लाख ६८ हजार ९७७

एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख २१ हजार ००३

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – टक्के ९६.९४


पुढील संकेतस्थळांवर दहावीचा ऑनलाइन निकाल पाहता येईल –

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in