महाराष्ट्र पुन्हा हादरला : भंडारा येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, पीडितेची प्रकृती चिंताजनक

Crime News

Bhandara Crime News: धक्कादायक आणि अतिशय अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. एका बेघर महिलेवर तीन जणांनी पाशवी बलात्कार केला व त्यानंतर प्राणघातक हल्ला केला.

पिडीतेवर अत्याचारानंतर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण घटनेने राज्य हादरले आहे.

भंडारा जिल्ह्यात एका बेघर महिलेवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

दिल्लीतील निर्भया घटनेपेक्षाही भीषण बलात्काराची घटना भंडारा येथे घडल्याने राज्याला धक्का बसला आहे. नागपूर रायपूर महामार्गावरील कान्हडमोह गावात रस्त्याच्या कडेला पीडिता गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली.

या महिलेवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केला होता. एवढेच नाही तर बलात्कारानंतर या महिलेवर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. या महिलेचे गर्भाशयपर्यंत अक्षरशः कापण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे. पण धोका अजूनही टळलेला नाही.

पतीने तिला सोडून दिल्याने ही महिला बेघर झाली होती. तिच्या असहायतेचा फायदा घेत तिघांनी तिला मारहाण केली. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.

पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींनी महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नागपुरात उपचार घेत असलेल्या पीडितेवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे.

येत्या तीन दिवसांत तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान कान्हडमोह गावाजवळ एका 35 वर्षीय महिलेवर वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता.

त्यानंतर पीडित तरुणी महामार्गाजवळ गंभीर अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आली. सुरुवातीला तिला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.