Maharashtra Minister Portfolios : विखे यांच्याकडे महसूल, मुनगंटीवारांकडे वन, चंद्रकांतदादांकडे उच्च आणि तंत्रशिक्षण, शिंदे सरकारचे खातेवाटप जाहीर

0
20
Maharashtra Minister Portfolios

Maharashtra Minister Portfolios | मुंबई : अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटप जाहीर केले आहे.

या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), वाहतूक, पणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, ही खाती आहेत.

आपत्ती व्यवस्थापन, मृद आणि जलसंधारण, पर्यावरण आणि हवामान बदल, अल्पसंख्याक आणि औकाफ आणि इतर विभाग कोणत्याही मंत्र्याला वाटप नसतील.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त आणि नियोजन, कायदा व न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, शाही शिष्टाचार ही खाती असतील.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मंजुरीनंतर हे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन खाते देण्यात आले आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते देण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच खात्यांचे वाटप करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, खातेवाटप जाहीर झाले नाही. त्यावरून शिंदे सरकारवर टीका झाली.

त्यानंतर खाते वाटपाची यादी सोशल मीडियावर फिरत होती. मात्र, तुम्ही प्रसारित केलेल्या यादीपेक्षा वेगळी खाती दिली जातील, असे फडणवीस यांनी जाहीर केले होते.

त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने खातेवाटप जाहीर केले आहे. अनेक मंत्र्यांना अनपेक्षित खाती देण्यात आली आहेत.

कुणाला कोणते खाते

राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुरेश खाडे: कामगार

संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत: उद्योग

प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास

गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे: बंदरे व खनिकर्म

संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन

रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार: कृषी

दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क