Latur Crime News : एका अंध-बधिर महिलेला उसात ओढून नेऊन अत्याचार केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील गातेगाव येथे घडली आहे. पीडित महिलेच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने हे कृत्य केले आहे.
त्याने घराजवळील उसामध्ये ओढून नेऊन अत्याचार केले. याप्रकरणी गातेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला तक्रार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
आरोपी नेहमी पीडितेचा विनयभंग करायचा
गातेगाव पोलीस हद्दीतील गटेगाव या गावात दोन मूकबधिर अंध महिला आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहतात. पीडित मुलगी आणि आरोपी शेजारी रहात आहेत.
पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत आरोपी बाळासाहेब साबळे हा गेल्या काही दिवसांपासून पीडितेचा व तिच्या बहिणीचा तिच्या घरी येऊन विनयभंग करत होता.
लोक येत असल्याचे पाहताच आरोपी पळून गेला
पीडित मुलगी आंधळी व बहिरी असल्याचा फायदा घेत आरोपीने पीडितेला घराजवळील शेतात ओढून नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. पीडितेचा आरडाओरडा ऐकून काही लोक घटनास्थळी धावले आणि आरोपी पळून गेला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार
पीडित तरुणी आणि तिचे नातेवाईक पोलिस ठाण्यात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास वेळ लागल्याचा आरोप नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.