Latur Crime News | संतापजनक : पतीनेचं शेतमालकाला पत्नीवर करायला लावला बलात्कार

0
57
Crime News

Latur Crime News | औसा/लातूर : औसा तालुक्यातील सारोळा परिसरात पतीनेच शेतमालक आणि त्याच्या भावाला आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, बलात्कारानंतर पीडितेने सुमारे 15 किमी अंतर चालत लातूरमधील दोन पोलीस ठाण्यात मध्यरात्री तक्रार दाखल केली.

मात्र दुर्दैव पीडितेला मदत मिळाली नाही. अखेर पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून तिच्या पतीसह तिघांवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ३३ वर्षीय महिला औसा तालुक्यातील सारोळा रोडवरील शेतात पतीसोबत राहत होती. पती पत्नी सालगडी म्हणून शेतात कामाला होते.

काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने महिला लातूरला आईकडे राहण्यासाठी आली होती. पती-पत्नीमध्ये तात्पुरते भांडण झाल्याने पीडितेच्या आईने ९ एप्रिल रोजी महिलेला तिच्या पतीला समजाऊन शेतात आणून सोडले होते.

रात्री नऊच्या सुमारास पीडितेच्या पतीने शेतमालक इल्लू शेख आणि मुसा शेख यांना घरी बोलावले. त्यानंतर पतीने त्यांना पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितले. त्या दोन्ही नराधमांनी पतीसमोरच त्याचा पत्नीवर बलात्कार केला.

रिपोर्टनुसार, शेतमालक व त्याच्या भावाने महिलेवर तिच्या पतीसमोर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने मध्यरात्री सुमारे 15 किमी चालत या घटनेची माहिती लातूर शहरातील ग्रामीण पोलीस ठाणे आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिली, मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाने तिला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जाण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार महिलेने तिच्या आईसह पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेतली. महिलेने स्वत:वर अत्याचार झाल्याची तक्रार दिल्यानंतर अधीक्षकांनी औसा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी औसा पोलिसात आरोपी पतीसह अन्य दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार तपास करत आहेत, अशी माहिती औसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर पटवारी यांनी पुढील तपास सुरु असून आरोपीला अटक केल्याचे सांगितले आहे.