LalSingh Chadha Boycott Trending : आमिर आणि करिनाच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटावर रिलीजपूर्वी बहिष्काराची मागणी

167
LalSingh Chadha Boycott Trending

LalSingh Chadha Boycott Trending | काही दिवसापासून बॉलीवूडवर वाईट वेळ आली आहे किंवा प्रेक्षकानी बॉलीवूड चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. बॉलीवूडच्या मागील काही वर्षाच्या मनमानीचा प्रेक्षकांना कंटाळा आला आहे. धर्म आणि संस्कृती बद्दल केली जाणारी टिंगल टवाळी दर्शकांच्या जिव्हारी लागली आहे.

आलिया भट्ट स्टारर गंगूबाई वगळता जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तोंडावर आपटले आहेत. रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्याचवेळी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून तब्बल 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.

आमिर आणि करिनाच्या चित्रपटावर लोक संतापले

आमिर खानने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, एक काळ असा होता की प्रेक्षक त्याच्या चित्रपटांची वाट पाहत असत.

Laal Singh Chaddha

आता 11 ऑगस्ट रोजी त्याच्या आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा संदर्भात ट्विटरवर #BoycottLaalSinghCaddha हा ट्रेंड करत आहे. आमिर खानच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमीपेक्षा कमी नाही.

त्याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करत आहे. #BoycottLaalSinghCaddha ट्विटरवर जोरदार ट्रेंड करत आहे.

युजर्स काय म्हणत आहेत?

आमिर खान आणि करीना कपूर स्टारर चित्रपट (LaalSingh Caddha) न पाहण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यामागील कारण दोन्ही स्टार्सचे काही जुने विधान आहे.

आमिर खानने त्याच्या पीके चित्रपटात म्हटले होते की, शिवलिंगाला दूध अर्पण करण्यापेक्षा गरीबाला दूध देणे चांगले आहे, या विधानावर एका युजरने म्हटले की, आमिर खानचा चित्रपट पाहण्यापेक्षा गरीबाला त्या पैशातून दूध पाजणे चांगले आहे.

करीना कपूरच्या ‘या’ वक्तव्याने चाहते भडकले

दुसरीकडे, करीना कपूरने तिच्या मागील एका विधानात म्हटले होते की, ‘आमचे चित्रपट पाहू नका, कोणतीही जबरदस्ती केली नाही’ या विधानामुळे प्रेक्षकांमध्येही नाराजी पसरली आहे. या दोन्ही सेलिब्रिटींच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत लोक त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.