Lakhimpur Double Murder Case : लखीमपूरच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा 2014 च्या बदायूं बलात्काराच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेशच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते, आता लखीमपूर प्रकरणानेही जोर पकडला आहे.
पोलिसांनी पोक्सो, एससी/एसटी कायदा, बलात्कार आणि खून अंतर्गत गुन्हा दाखल केला असून 6 आरोपींना अटक केली आहे. पण पीडित कुटुंबाचा दावा आहे की त्यांच्या मुलींचे आधी अपहरण करण्यात आले आणि नंतर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली.
दुसरीकडे, पोलिस हे दावे खोटे असल्याचे सांगत आहेत. आता या दोन वेगवेगळ्या दाव्यांमध्ये आजतकने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. त्या दोघी बहिणींचं काय झालं ते समजून घेण्याचा प्रयत्न?
14 सप्टेंबरचा फोन कॉल
या संपूर्ण कथेची सुरुवात 14 सप्टेंबर रोजी एका फोन कॉलने झाली. दुपारी 12 वाजता मोठ्या बहिणीने जुनैदला फोन केला होता. जुनैदला ती गेल्या एक वर्षापासून ओळखत होती.
दुसरी पिडीत असलेली लहान बहीण सोहेलला गेल्या 9 महिन्यांपासून ओळखत होती. यूपी पोलिसांच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, जुनैद आणि सोहेल दोन्ही बहिणींचे शारीरिक शोषण करत होते.
दोघांनीही मुलींशी लग्न करणार असल्याचे वचन दिले होते. 14 सप्टेंबर रोजी मुलींनी मुलांसोबत पळून जाण्याचा निर्धार केला आणि या उद्देशाने त्यांनी मुलांना बोलावले.
नेमके काय घडले?
त्यामुळे सर्व तयारी आधीच झाली होती. आता असे झाले की मोठ्या बहिणीचा फोन आल्यानंतर जुनैद आणि सोहेल त्यांच्या बाईकसह तिच्या घरी पोहोचले.
त्यांच्यासोबत हफिझुल (प्रकरणातील आरोपी)ही आला होता, ते सर्व पुन्हा निघून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनैद आणि सोहेलने दोन्ही बहिणींना घरातून नेल्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केला. तोपर्यंत त्याचा साथीदार हाफिजुल हा पहारा देत होता.
लग्णाचे वचन आणि फसवणूक
चौकशीत आरोपींनी आपल्या कबुलीजबाबात सांगितले की, ते घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही बहिणींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली.
मुली लग्नासाठी आग्रही होत्या, लग्नाचे दिलेले वचन पाळले पाहिजे, असा हट्ट करीत होत्या. प्रकरण पुढे सरकत असल्याचे पाहून दोन्ही आरोपींचे धाबे दणाणले.
त्यांनी अत्यंत रागाच्या भरात त्यांनी दोन्ही बहिणींवर आधी बलात्कार व नंतर हत्या केल्याचे आरोपींनी सांगितले. मोठ्या बहिणीने अधिक विरोध केला, ज्यामुळे तिच्या शरीरावर तीन अतिरिक्त जखमांच्या खुणा दिसल्या आहेत. हे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून सिद्ध झाले.
प्रत्यक्षदर्शींच्या जबानीतून मोठा खुलासा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी दोन्ही बहिणींची हत्या केली, नंतर त्याला आत्महत्येचे रूप देण्याचा अतिशय हुशारीने प्रयत्न केला.
या कारणावरून दोन्ही बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. प्रत्यक्षात हत्येनंतर जुनैदने करीमुद्दीन आणि आरिफ (दोन्ही आरोपी) यांना बोलावले आणि त्यानंतर त्यांच्या मदतीने दोन्ही बहिणींचे मृतदेह झाडाला लटकवले.
पीडितेच्या कुटुंबीयांना त्या मुलांची ओळख होती का?
आता पोलीस अधिकाऱ्याच्या वक्तव्यानंतर आज तकने गावातील स्थानिक व्यक्तीशीही संवाद साधला. त्याने सांगितले की, दोन्ही बहिणी आरोपीला आधीपासूनच ओळखत असल्याचे सर्वांना माहीत आहे.
जुनैद आणि सोहेल या दोघांशी त्याची गावातील छोटू (आरोपी) या मुलाने ओळख करून दिली होती. अशा स्थितीत पोलिसांनी मांडलेल्या सिद्धांतावर काही ग्रामस्थांनी शिक्कामोर्तबही केले आहे.
एका गावकऱ्याने तर असा दावा केला आहे की, त्यांच्या घरातील मुली या मुलांना भेटत असल्याने पीडित कुटुंब नाराज होते. पोरांचे धर्म वेगळे होते, त्यामुळे घरात तणाव जास्त होता. काही वेळा तर कुटुंबीयांनी या कारणावरून मुलींना मारहाण केली.
पोलिसांचा तपास कसा पुढे गेला?
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अनुक्रमे सर्व आरोपींना अटकही केली आहे. सर्वप्रथम लालपूर गावातून तीन मुलांना पकडले. त्यानंतर हफिजूर आणि सोहेललाही पोलिसांनी पकडले.
त्यानंतर हफिजूरची कसून चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणात करीमुद्दीन आणि आरिफची भूमिकाही स्पष्ट झाली. त्याआधारे रात्री उशिरा दोघांना घरातून अटक करण्यात आली.
दुसऱ्याच दिवशी जुनैदला पोलिसांनी पुन्हा अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. सध्या सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.