How To Complete eKYC | PM Kisan Nidhi Yojana : पंतप्रधान किसान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 11 व्या हप्ता लवकरच जारी होणार आहे.
त्यासाठी सरकारने लाभार्थ्यांना केवायसी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतू केवायसी करण्यासाठी अनेक लाभार्थी हैराण झाले आहेत.
त्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रांवर जाण्याची गरज नाही. घरबसल्याही लाभार्थ्यांना केवायसी करता येणार आहे.
यासाठी योजनेच्या खात्यावर तुमचा आधार आणि मोबाईल नंबर लिंक करावा. जर या दोन्ही लिंक असतील तर तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवरून ओटीपीद्वारे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
पीएम किसान पोर्टलवर आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण काही दिवसांसाठी थांबवण्यात आले होते, जे आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
31 मे पूर्वी ई-केवायसी पूर्ण करा
तुम्ही पीएम किसानशी संबंधित ई-केवायसी अद्याप पूर्ण केले नसेल, तर तुमचा 11 वा हप्ता थांबू शकतो.
पीएम किसान पोर्टलवर आधार आधारित ई-केवायसी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. वास्तविक, सरकारने ई-केवायसी नियम अनिवार्य केले आहेत.
ई-केवायसी कसे पूर्ण करावे?
1: सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर PM किसान वेबसाइट (pmkisan.gov.in) उघडा. येथे उजव्या बाजूला e-KYC ची लिंक दिसेल.
2 : येथे आधार (AADHAAR) शी लिंक केलेला मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि Search बटणावर टॅप करा.
आता तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP येईल. दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करा.
3: तुम्हाला पुन्हा आधार प्रमाणीकरणासाठी बटण टॅप करण्यास सांगितले जाईल.
त्यावर टॅप करा आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल. ते भरा आणि सबमिट वर टॅप करा.
4: यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid असा संदेश येईल. तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन ते दुरुस्त करू शकता.
eKYC आधीच केले असल्यास, eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश येईल.
30 जूनपर्यंत सोशल ऑडिट
1 मे ते 30 जून दरम्यान शासनाकडून सोशल ऑडिट करण्यात येत असल्याचेही वृत्त आहे.
या ऑडिटमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र व अपात्र लोकांची माहिती संकलित केली जाणार आहे.
यानंतर, यादीतून अपात्रांची नावे काढून टाकली जातील आणि पात्र लोकांची नावे जोडली जातील.