बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूरमधील पंपरा गावात 24 एप्रिल रोजी एका मुलीचा विवाह निश्चित झाला होता. लग्नाच्या दिवशी ठरलेला मुहूर्त टळून गेल्यानंतर नवरा मुलगा वरातीसह मंडपात पोहोचला.
त्यानंतर तो गाडीतून उतरल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत मित्रांसोबत नाचत होता. किती वेळ नाचतोय याचे त्याला भानच नव्हते. त्याच्या नाचण्याने नवरी भलतीच वैतागली होती.
नवरदेवाच्या नाच संपेपर्यंत वधू हातात वरमाला घेऊन बरेच तास उभी होती, पण याचे त्याला अजिबात भान नव्हते. नवरीच्या वडिलांनाही याचा प्रचंड राग आला.
यामुळे गावात अपमान सहन करावा लागला असता. ही घटना गावातील पंचायत समितीला कळली तेव्हा त्यांच्या निर्णयानुसार लग्नाला आलेल्या पाहुण्यांपैकी आवडलेल्या एका मुलासोबत मुलीचा विवाह लावून देण्यात आला.
लग्नाच्या मंडपातून हाकलून दिल्यानंतर पहिल्या वराने दुसर्या दिवशी दुसऱ्या मुलीशी थाटामाटात लग्न केले. मात्र, या लग्नात तो नाचला नाही तसेच त्याचे मात्र आणि नातेवाईकही दारू प्यायले नाहीत. वराने सांगितले की, जिथे लग्न होणार तिथे लग्न होते. देवच नवरा-बायकोची जोडी बनवतो.