मोहालीत भीषण अपघात, दसरा मैदानात 50 फूट उंचीवरून कोसळला मोठा झूला, 50 जण जखमी

VIDEO: Horrible accident in Mohali, huge swing falls from a height of 50 feet in Dussehra Maidan, 50 people injured

मोहाली : पंजाबमधील मोहालीमध्ये झुला पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मोहाली फेस 8 दसरा मैदानावर झालेल्या जत्रेत अचानक सुमारे 50 फूट उंचीचा ‘ड्रॉप टॉवर स्विंग झूला’ एकदम खाली पडला.

ज्यात सुमारे 50 लोक झूल्यात बसले होते. झुल्यात बसलेले सर्वजण जखमी झाले. या अपघातात 4 लहान मुलांसह 7 महिला गंभीर जखमी झाले आहेत.

ड्रॉप टॉवर स्विंग परत खाली येत असताना स्विंगचा हुक वायरमधून बाहेर आला, त्यानंतर 6 सेकंदात स्विंग वेगाने खाली आला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

ज्यावरून हा अपघात किती धोकादायक होता, याचा अंदाज येतो. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ जखमींना त्यांच्या वाहनातून रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली.

अपघाताचे वृत्त समजताच एसडीएम आणि डीएसपी घटनास्थळी पोहोचले. चौकशीनंतर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोहाली जिल्हा प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रशासकीय स्तरावर आता अधिकारी या मेळा, झुले आदींच्या आयोजनासाठीच्या मंजुरी आणि सुरक्षा उपायांची तपासणी करतील.

मेळ्याचा आयोजक सनी सिंग याच्याकडे पोलिसांची चौकशी सुरू आहे. मोहालीचे उपायुक्त अमित तलवार यांनीही या अपघाताबाबत कठोर कारवाई करण्याचे सांगितले आहे.

दसरा मैदानावर भरलेल्या जत्रेला लंडन ब्रिज असे नाव देण्यात आले होते. हा मेळा 11 सप्टेंबरपर्यंत चालणार होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्काळजीपणाचे हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे.

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये चरखा असलेला हा स्विंग अचानक खाली येताना आणि वेगाने घसरताना दिसतो.