ज्ञानवापी केस: ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी कोर्टाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने ही बाब सुनावणी योग्य धरली आणि याच आधारावर याचिका फेटाळून लावली.
ज्ञानवापी प्रकरणात हिंदू बाजूची याचिका ऐकू नये, असा आग्रह मुस्लिम बाजूच्या वतीने धरण्यात आला होता. मात्र, या याचिकेवर सुनावणी शक्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याच कारणामुळे मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळण्यात आली आहे.
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग महेंद्र कुमार पांडे यांच्या न्यायालयात 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता.
सुनावणीदरम्यान, मुस्लिम पक्षाच्यावतीने जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात प्रलंबित असलेले शृंगार गौरी प्रकरण केवळ पूजेबाबत असल्याचे सांगण्यात आले.
तर या प्रकरणात ते ज्ञानवापी मशिदीच्या टायटल बद्दल आहे. त्यामुळेच न्यायालय खटला फेटाळून लावेल, अशी त्यांना पूर्ण आशा होती. मात्र सध्या न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी करणार आहे.