PUBG Online Love Story : या जगात कधी, कोणाशी, कोण कोणाच्या प्रेमात पडेल काहीच सांगता येत नाही. अशाच एका प्रेमाची कहाणी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून समोर आली आहे.
येथे ऑनलाइन गेम खेळत असताना रायसेनचा मुलगा नैनिताल येथील मुलीच्या प्रेमात पडला. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले दिले. प्रेम इतके वाढले की दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले.
या ऑनलाइन प्रेमाची गोष्ट तेव्हा उघडकीस आली जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी नैनिताल पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
ही तरुणी सध्या रायसेनमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. नैनिताल पोलिस जेव्हा मुलीला रायसेन येथून परत घेण्यासाठी गेले तेव्हा मुलीने येण्यास नकार दिला.
या प्रेम कथेची सुरुवात ऑनलाइन गेम PUBG च्या माध्यमातून झाली असल्याचे सांगितले जात आहे. PUBG खेळताना दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी होऊ लागल्या.
पोलिसांनी सांगितले की, नैनिताल पोलिसांनी रायसेन पोलिसांच्या मदतीने वॉर्ड क्रमांक 11 मध्ये राहणारे योगेश आणि शीतल यांना पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिस ठाण्यात दोघांचे जबाब नोंदवण्यात आले.
नैनिताल पोलिसांना मुलीला सोबत घेऊन जायचे होते पण मुलीने जाण्यास नकार दिला. तिला पती योगेशसोबत रायसेनमध्ये राहायचे आहे.
ती म्हणाली की, मी प्रौढ असून माझ्या मर्जीने योगेशशी लग्न केले आहे. माझ्यावर कोणतेही दडपण नाही. नैनिताल पोलिसांनीही होकार दिला आणि मुलीला न घेता नैनितालला परतले.