Delhi Crime News | राजधानी दिल्लीत, शाळेतून घरी जाणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी दक्षिण जिल्हा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
बॉबी आणि पवन अशी पकडलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन पिस्तुले जप्त केली आहेत. सध्या पोलीस या प्रकरणी अरमान अली नावाच्या तरुणाचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान अली नावाचा तरुण दोन वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित तरुणीच्या संपर्कात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
गेल्या 5-6 महिन्यांपासून मुलीने अरमान अलीशी बोलणे बंद केले. यामुळे अरमान अली संतापला होता. त्यासाठी त्याने मुलीला गोळ्या घालण्याचा कट रचला होता.
विद्यार्थिनीवर गोळ्या झाडण्यात आल्या
25 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलगी शाळेतून घरी जात होती. मुलगी संगम विहारच्या बी ब्लॉकवर पोहोचली तेव्हा मागून दुचाकीवरून आलेल्या तीन मुलांनी तिच्यावर गोळी झाडली आणि पळ काढला.
गोळी मुलीच्या खांद्याला लागली होती. लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर्म ऍक्ट आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्वप्रथम संगम विहारच्या ब्लॉकमधून बॉबी नावाच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर संगम विहारच्या एच ब्लॉकमधून पवन नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सध्या पोलीस तिसऱ्या आणि मुख्य आरोपी अरमान अलीचा शोध घेत आहेत.