Crime News : तीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह रस्त्यावर आढळल्याने अंबरनाथमध्ये एकच खळबळ 

Crime News: The body of a 30-year-old man was found on the road

अंबरनाथ : अंबरनाथ गुन्ह्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला आहे. अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिखलोली परिसरातील एका मोकळ्या जागेत आज (शुक्रवारी) सकाळी मृतदेह आढळून आला.

मयत इसमाचे वय 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. तो परिसरात काम करत असावा, असे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास त्याची हत्या झाल्याचा अंदाज असून पोलीस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय आहे प्रकरण?

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात शुक्रवारी सकाळी एक अनोळखी मृतदेह आढळून आला. अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिखलोली परिसरात एका मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आला.

तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या तरुणाची हत्या झाल्याचे समजते. पोलीस सध्या त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मृत तरुण 30 ते 35 वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. तो परिसरात काम करत असावा, असे पोलिसांनी सांगितले.

इसमाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे. अंबरनाथ पश्चिम पोलिस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली.

RECENT POSTS