बंगळुरू : एका विवाहितेला प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध ठेवणे चांगलेचं अंगलट आले आहे. पतीची फसवणूक करीत प्रियकरासोबत संबध ठेवणाऱ्याला महिलेला तिच्याच पुतण्यानं हॉटेलात नको त्या अवस्थेत पकडले.
त्यांनतर हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर, पुतण्याने आपल्या काकूचा तिच्या प्रियकरा सोबतचा व्हिडिओही बनवला. त्या व्हिडिओला व्हायरल करण्याची धमकी देत 25 लाखांची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकच्या बंगळूरू शहरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका सख्या पुतण्यानं आपल्या काकूला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत पकडले. त्यानंतर त्याने दोघांचा व्हिडिओही बनवला.
हा व्हीडीओ काकाला दाखवण्याची धमकी देत त्याने काकूकडे 25 लाखांची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या पुतण्यासह त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. सुरेश बाबू असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पतीसह बंगळुरू शहरात राहते. मागील 10 वर्षांपासून या महिलेचे प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध होते. महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत हॉटेलात जात होती. दरम्यान, सुरेशची प्रेयसी आणि त्याच्या काकूची चांगली ओळख होती.
सुरेशच्या प्रेयसीला काकूच्या विवाहबाह्य संबंधाचा संशय आला होता. त्यानंतर एकेदिवशी तिने काकूला याविषयी विचारले असता कुणाला सांगू नको, असे म्हणत काकूने तिच्याजवळ आपल्या प्रेम प्रकरणाची कबूली दिली. दरम्यान, प्रेयसीने ही गोष्ट आपला प्रियकर सुरेश म्हणजेच काकूच्या पुतण्याला सांगितली.
त्यानंतर दोघांनीही काकूला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला. एकेदिवशी काकू आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली. तेव्हा काकूने भेटीसाठी रुमही बुक केली. तेव्हा सुरेश आणि त्याच्या प्रेयसीने काकूच्या बाजूची रूम बुक करत काकूवर नजर ठेवली.
जेव्हा काकूचा प्रियकर भेटण्यासाठी हॉटेलात आला. तेव्हा बेल वाजवत दोघांनीही हॉटेलमधील काकूच्या रुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुरेश आणि त्याच्या प्रेयसीने काकूसह तिच्या प्रियकराचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ काकाला दाखवून तो व्हायरल करू अशी धमकी देत दोघांनीही काकूकडे 25 लाख रुपयांची मागणी केली.
आपले विवाहबाह्य संबंध पतीला कळू नये म्हणून सुरूवातीला काकूने काही पैसे पुतण्याला दिले. मात्र दिवसेंदिवस त्याची मागणी वाढतच असल्याने काकूने पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी सुरेशसह त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.