अमरावती: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही लोकांनी प्रेमप्रकरणातून एकमेकांचा जीव घेतल्याचे दिसते. देशभरात अनैतिक संबंध आणि त्याच्याशी निगडीत खुनाच्या अनेक घटना समोर येत आहेत.
अमरावती येथेही अशीच एक खुनाची घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तुरुंगात टाकले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना येथे ही घटना घडली. अमित उपाध्याय असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अमित आणि एका विवाहित महिलेचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. महिलेला दोन मुले असली तरी ती अमितच्या प्रेमात पडली. ही बाब घरात समजल्यानंतर महिलेच्या पतीने तिला मारहाण केली. मुलांनाही आईच्या वागण्याचा राग आला.
त्यामुळे गेल्या एक वर्षापासून ही महिला पतीचे घर सोडून प्रियकर अमितसोबत राहत होती. ते दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये एकत्र राहत होते.
महिलेच्या अशा वागणुकीमुळे महिलेच्या पतीला परिसरात व कुटुंबात अत्यंत अपमानास्पद जीवन जगावे लागले. त्यामुळे तो अमितवर खूप चिडला होता. मुलांच्या संमतीने त्यांने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
पत्नीचे अपहरण
त्यांनी ठरवलं की अमितचा काटा कायमचा काढून टाकायचा. त्यानंतर मुलांच्या मदतीने आरोपींनी अमितला बेदम मारहाण केली. सुरुवातीला त्याने अमितला काठीने खूप मारहाण केली. त्यानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या केली.
घटनेनंतर ते सर्वजण तेथून पळून गेले. मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. अमितच्या हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.