Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. हत्येनंतर तो स्वत: पोलीस ठाणे गाठून म्हणाला की, ‘मला अटक करा’.
हे प्रकरण गाझियाबादमधील नंदग्राम पोलीस स्टेशन हद्दीतील मोर्टी गावातील आहे. येथे सोमवारी पहाटे तीन वाजता अंकित नावाचा एक व्यक्ती पोलिस ठाण्यात येतो आणि सांगतो की, त्याने आपल्या पत्नीची हत्या केली असून त्याला अटक करावी.
हे समजताच पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीसही चक्रावून गेले. अंकितने सांगितले की, त्याने त्याची सहा महिन्यांची गरोदर पत्नी तनुचा गळा चाकूने कापून खून केला.
पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितले की, पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध होते, म्हणून त्याने तिची हत्या केली.
साहिबााबादमधील गरिमा गार्डनमध्ये राहणाऱ्या तनूचे वडील रमेश पाल यांनी सांगितले की, सहा वर्षांपूर्वी त्यांनी आपली मुलगी तनुपालचे लग्न नंदग्राम येथील मोर्टी येथील पत्रम पाल यांचा मुलगा अंकित पाल याच्याशी केले होते.
लग्न झाल्यापासून दिर सुनील पाल आणि पती अंकित पाल तिचा हुंड्यासाठी छळ करत होते, असा आरोप आहे. अनेकवेळा मारहाण केली. रविवारी रात्री अंकितने आपल्या मुलीची हत्या केली.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून
जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना तनूचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. नंदग्राम पोलीस ठाण्याचे प्रभारी मुनेंद्र कुमार यांनी सांगितले की, आरोपी पती अंकित पाल याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येत आहे. तनुचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. चौकशीत त्याने सांगितले की, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पत्नी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याचा अंकितला संशय होता. याकारणाने त्याने तनूची हत्या केली.