पनवेल : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पनवेल तालुक्यातील चिंचवली गावात वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीने व्यभिचाराच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात वीट मारून तिचा खून केला.
घटनेनंतर पती शेजारच्या जंगलात पळून गेला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जंगलात पळून जाणाऱ्या पतीला अटक केली. पतीला विचारपूस केली असता, पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याने आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.
चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते आणि या वादातूनच पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.