Crime News: Famous YouTuber Honeytrap | दिल्लीतील प्रख्यात यूट्युबर नामरा कादिर हिला एका उद्योगपतीला हनी ट्रॅपिंग करून 80 लाख रुपये उकळल्याप्रकरणी आणि बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोर्टाने तिची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामरा कादिर या 21 वर्षीय यूट्युबरने एका व्यावसायिकासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायला सुरुवात केली.
त्यानंतर पीडित तरुणाने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली असता. त्यानंतर नमरा कादिरने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
22 वर्षीय नमरा कादिरचे विविध व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. जेव्हा तिने असे केले, आणि त्या प्रकरणात कोठडीत धाडले गेले यावर तिच्या चाहत्यांचा विश्वास बसला नाही.
नमारा हिने तिच्या पतीसोबत संगनमत करून गुडगावमध्ये सौंदर्याच्या जोरावर एका श्रीमंत व्यावसायिकला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याच्याशी शरीर संबंध स्थापित केले.
त्याचे काही फोटो व व्हिडीओ बनवले. त्यानंतर तिने फोटो व व्हिडीओ दाखवत व्यावसिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 78 लाखांहून अधिक रुपये उकळले होते.
गुडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमरा कादिरकडे तिच्या किंवा व्यावसायिकासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाची काही छायाचित्रे होती.
बलात्कार किंवा व्यावसायिकाला बलात्काराच्या आरोपाखाली गोवण्याची धमकी दिली होती. तसेच तिने त्याच्याकडून लाखो रुपये घेतले होते. अखेर पीडित व्यावसायिकाने धाडस करून पोलिसांकडे तक्रार केली
तेव्हा पोलिसांनी तातडीने तिच्या मुसक्या आवळल्या. कादिरने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पीडित व्यक्तीकडून घेतलेले पैसे व इतर वस्तू जप्त करण्यासाठी पोलिसांनी तिला रिमांडवर घेतले आहे.
तिचा पती आणि सहआरोपी मनीष उर्फ विराट बेनिवाल याला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.