Crime News : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. स्कूल बस चालकाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मुलीवर बलात्कार केला.
पिडीत युवती गरोदर राहिल्यानंतर बेकायदेशीररित्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिला एका नर्सिंग होममध्ये नेले. दुर्दैवाने गर्भपात करताना मुलीचा मृत्यू झाला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात स्कूल बसचा चालक आणि नर्सिंग होमच्या ऑपरेटरला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
हे प्रकरण वाराणसीच्या चोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. वाराणसी जिल्ह्यातील चोलापूर भागातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय मुलीच्या आईचा मृत्यू झाल्याने ती तिच्या मामाकडे राहायची.
सारनाथच्या अकाठा येथील रहिवासी असलेल्या प्रद्युम्न यादव याने एका खासगी शाळेच्या बसचा चालक असून महाविद्यालयात ये-जा करत असताना या तरुणीला प्रेमप्रकरणात अडकवले.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याने मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, मुलगी गरोदर राहिली. यावर प्रद्युम्नने तिला नवापुरा येथील गणेश-लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यासाठी भरती केले.
रुग्णालयाच्या संचालक शीला पटेल आणि डॉ.लल्लन पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातादरम्यान पिडीत मुलीचा मृत्यू झाला.
गर्भपात करताना मुलीचा मृत्यू झाल्यानंतर प्रद्युम्न यादवने त्याचा मित्र अनुराग चौबे सोबत तिला दुसऱ्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मुलगी मृत झाल्याचे सांगत तिला दाखल करण्यास नकार दिला.
यानंतर मृतदेह लपवण्याच्या प्रयत्नात प्रद्युम्नने पुन्हा मित्रासह नवापुरा येथील गणेश-लक्ष्मी हॉस्पिटल गाठले. तोपर्यंत गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाली. ग्रामस्थांच्या माहितीवरून नातेवाईकही पोहोचले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.