Crime News : पहिल्यासोबत अरेंज मॅरेज, दुसऱ्यासोबत प्रेमविवाह; नागपुरात एकाचं महिलेचे तीन विवाह

0
26
Crime News : Arranged marriage with first, love marriage with second; Three marriages of one woman in Nagpur

नागपूर : नागपुरातील एका महिलेचे तिच्या वस्तीतील तरुणाशी लग्न झाले. काही वर्षांनंतर महिलेच्या मोबाईलवर एका तरुणाचा मिस कॉल आला. त्यानंतर महिलेने त्याच्याशी बोलणे सुरू केले. काही दिवसात त्याच्याशी सूत जुळले.

यानंतर महिलेने पतीला सोडून दुसरे लग्न केले. काही दिवसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आणखी एका तरुणाशी ओळख झाली. यानंतर तरुणीने दुसरे लग्न मोडले. दुसरा नवरा सोडला आणि आता तिसर्‍यासोबत राहत आहे. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या पतीने महिलेविरोधात पोलिसात धाव घेतली आहे.

दोन जण महिलेविरुद्ध तक्रार घेऊन आले होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला. त्यांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी दिली.

नागपूरच्या वाठोडे येथे राहणारा 25 वर्षीय धीरज हा गवंडी काम करतो. 18 वर्षीय संगीता (नाव बदलले आहे) तिच्या मोठ्या बहिणीसोबत कामाच्या शोधात गावातून नागपुरात आली. धीरज आणि ललिता यांची नागपुरात भेट झाली. 2 महिन्यांनी त्यांचे लग्न झाले. दोघांना एक मुलगा आहे.

एके दिवशी ललिताला औरंगाबादमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय पवनचा मिस कॉल आला. दोघांमध्ये बोलचाल सुरू झाली. ललिता पवनच्या प्रेमात पडली. तिने पवनला नागपूरला बोलावले. अविवाहित असल्याचे सांगून ती पवनला लग्नासाठी विचारले.

त्यानंतर पवनने नागपुरात काम शोधले. ललिताने धीरजला आपण गावी जात असल्याचे सांगितले. यानंतर ललिता पवनसोबत निघून गेली. दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले आणि त्यानंतर ते नागपुरातील सोनेगाव येथे राहू लागले.

काही दिवसांनी ललिता सचिनला इंस्टाग्रामवर भेटली. ललितचा दुसरा नवरा पवन घरी नसताना सचिन तिच्या घरी ये-जा करू लागला. त्यानंतर ललिता सचिनच्या प्रेमात पडली.

त्यानंतर सचिन ललितासोबत लग्न करण्यास तयार झाला. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. यानंतर ललिताच्या पहिल्या आणि दुसऱ्या पतीने तिचा शोध सुरू केला.

ललिताचे तिसरे लग्न सचिन नावाच्या तरुणाशी झाल्याचे दोघांनाही कळले. यानंतर दोघांनी पोलीस ठाणे गाठून न्यायाची मागणी केली. त्यामुळे आता पोलिसांपुढे नवाच पेच निर्माण झाला असून, पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत.